मुंबई ग्राहक पंचायतीच्या तक्रार निवारण मार्गदर्शन कक्षाची तिमाही बैठक दादर कार्यालयांत दि.३०/१०/२०१० या दिवशी दु.३वा. कार्योपाध्य्क्ष श्री.भालचंद्र नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली.
श्रीम.कोरडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले,दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व श्री.भालचंद्र नाईक व प्रमुख वक्ते श्री.अभय दातार यांची ओळख करून दिली.
श्री.अभय दातार यांनी आपल्या दीड तासाच्या अभ्यासपूर्ण भाषणांत "बॅंकिंग"संबंधी ग्राहकांना उपयुक्त अशी माहिती दिली. ग्राहकांच्या सोयीसाठी या व अन्य उपयुक्त विषयावर फोल्डर्स प्रसिद्ध करावीत अशी सूवना श्री.कमळाकर पेंडसे यांनी केली.
प्रश्नोत्तरानंतर श्रीम.कोरडे यांनी संबंधितांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रम संपला.
Saturday, October 30, 2010
Monday, February 22, 2010
गिरगांव विभाग-२०वा वार्षिक मेळावा (२१/०२/२०१०)
मुंबई ग्राहक पंचायतीच्या गिरगांव विभागाचा २० वा वार्षिक मेळावा रविवार दि.२१/०२/२०१० रोजी संध्याकाळी ४.३०वा स्वस्तिक लीगच्या सभागृहांत सुरू झाला.
व्यासपीठावर मध्यभागी विभागाच्या अध्यक्षा श्रीमती वसुंधरा पेंडसे-नाईक,त्यांच्या डावीकडे विभागाचे कार्याध्यक्ष श्री.अभय दातार व मुं.ग्रा.पं.चे कार्योपाध्यक्ष श्री.भालचंद्र नाईक व अध्यक्षांच्या उजवीकडे प्रमुख पाहुण्या श्रीमती अनुराधा देशपांडे व विभागाच्या कार्यवाह श्रीमती शकुंतला म्हात्रे चित्रांत दिसत आहेत.
(छायाचित्र : विभागाच्या सहकार्यवाह श्रीमती सविता चवाथे यांच्या सौजन्याने)
Monday, February 15, 2010
विलेपार्ले विभाग रौप्य महोत्सवी ग्राहक मेळावा १४/२/२०१०
मुंबई ग्राहक पंचायतीच्या विलेपार्ले विभागाचा रौप्य महोत्सवी वार्षिक समारंभ रविवार दि.१४/२/२०१० या दिवशी दु.४ ते ७ या वेळांत विलेपार्ले महिला संघाच्या सभागृहांत साजरा झाला.प्रमुख पाहुणे म्हणून डॅ।.गिरीश जाखोटिया उपस्थित होते.या प्रसंगी कै.भाऊमामा गोगटे पारितोषकांचे वितरण, समारंभाचे अध्यक्ष श्री.भालचंद्र नाईक यांच्या हस्ते करण्यांत आले.विभागाच्या कार्याध्यक्षा श्रीमती आशालता वाघमोडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.डॅ। जाखोटिया यांनी कृष्णचरित्रांतील प्रसंगांचा संदर्भ देत आजच्या काळांत कृष्णाचा आदर्श ठेवून आपण सर्वांनी त्याप्रमाणे वागले पाहिजे असे अत्यंत परिणामक पद्धतीने प्रतिपादन केले.
Monday, February 8, 2010
बोरीवली विभाग मेळावा- ९ जानेवारी २०१०
Thursday, January 21, 2010
CENTRAL ADVISORY COMMITTEE of CERC, Delhi.
It gives me pleasure to congratulate Ad.Shirish Deshpande,Chairman Mumbai Grahak Panchayat on his appointment as a member of Central Advisory Committee of CERC (Central Electricity Regulatory Commission)
This committee gives advice on major questions of policy,quality,continuity and expert services provided by licensees,protection of consumer interests and overall standards of performance by utilities.

Wednesday, January 20, 2010
गुंतवणुकदारांच्या माहितीसाठी.
सस्नेह नमस्कार,
कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय, भारत सरकार, यांनी गुंतवणुकदारांचे सक्षमीकरण, प्रशिक्षण, अधिकार मिळवून देणे, त्यांचे संरक्षण करणे, आदी गोष्टींसाठी
पुढाकार घेतला असून खालील वेबसाईट्स / ऑनलाईन सेवा चालू केल्या आहेत.
1) कंपन्यांबाबत सर्वंकष माहितीसाठी : www.mca.gov.in
2) ऑनलाईन गुंतवणुकदार तक्रार निवारणासाठी : www.investorhelpline.in
3) गुंतवणुकदार जागृतीशी संबंधित माहिती : www.iepf.in
4) कर्तव्यच्युती वा नियमांचे उल्लंघन करणा-या कंपन्या वा संचालकांबाबत महितीसाठी : www.watchoutinvestor.com
आपण आवश्यकता पडल्यास वरील सेवेचा लाभ अवश्य घ्या.
(संदर्भ : दै. लोकसत्ता, 8 डिसेंबर, 2009.)
धन्यवाद,
अभय दातार,
कार्याध्यक्ष, गिरगाव विभाग

Sunday, January 17, 2010
दहिसर विभागाचा मेळावा (१७/०१/१०)
रविवार दि.१७/०१/१० रोजी मुं.ग्रा.पं.च्या दहिसर विभागचा मेळावा विभागाचे अध्यक्ष श्री.जयकुमार शहा यांच्या अध्यक्षतेखाली समाज कल्याण मंदिर, दहिसर (प) येथे सं. ५.०० ते ८.३० या वेळांत झाला. संस्थापक सदस्य श्री. अशोक रावत, संस्थेचे अध्यक्ष डॅ।.रामदास गुजराथी, कार्यवाह श्रीम. ज्योती मोडक, निसर्गोपचार तज्ज्ञ श्री. अरुण जोगदेव आदि मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलनानंतर चि.निनाद व सायली शेंबेकर यांच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. श्री.कांबळी यांनी अहवाल वाचन केले तर श्री.होडावडेकर यांनी सूत्रसंचालन केले.
“शाश्वत जीवनशैली” या विषयावर बोलतांना श्री.अशोक रावत यांनी गरजेपुरता उपभोग हे सूत्र संवेदनशील ग्राहकाने ध्यानांत ठेवले पाहिजे, असे आग्रहाचे प्रतिपादन केले. उत्पादनांत वाढ,वितरणांत समानता आणि उपभोगावर संयम या त्रिसूत्रीबरोबरच पर्यावरणाचे संतुलन या चवथ्या सूत्राचा अवलंब आपण केला पाहिजे. त्यासाठी मर्यादित नैसर्गिक स्रोतांचा आणि पर्यावरणाचा कमीत कमी ऱ्हास होऊन मर्यादित साठे पुढील पिढीसाठी राखून ठेवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. Refuse, Reduce, Repair, Reuse, Recycle करून कचऱ्याची विल्हेवाट लावतांना त्यापासून संपत्ती कशी निर्माण करता येईल, हे पाहण्यास सांगितले.
श्री. अरुण जोगदेव यांनी माणसाला औषधांची गरज नाही हे ठासून सांगितले. चहा, कॅ।फी, साखर, डालडा, त्यात बनविलेली बिस्किटे आदि पदार्थ याद्वारे एकप्रकारे आपण विषप्राशन कसे करतो, हे त्यांनी निदर्शनास आणले. भाज्यांचे सूप, कच्चे अन्नपदार्थ, भात, पोळी खाऊन कसे निरोगी जगता येते, हे अनेक उदाहरणाद्वारे त्यांनी समजाऊन सांगितले.
डॅ।.रामदास गुजराथी व श्री. जयकुमार शहा यांनी पुरेश्या वेळेच्या अभावी थोडक्यांत, समयोचित बोलून ग्राहकांना मार्गदर्शन केले.
अंधेरी विभागांतील कार्यकर्त्यांनी श्रीम नीला म्हात्रे लिखित,दिग्दर्शित ग्राहकविषयक पथनाट्य प्रभावीपणे सादर केले.
जेवणसदृश अल्पोपहार व आभारानंतर कार्यक्रम संपला.
मुं.ग्रा.पं.च्या कार्यक्रमांचे फोटो श्री.राजेन्द्र राणे,बोरीवली यांच्या सौजन्याने उपलब्ध होतात. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.
Saturday, January 16, 2010
"लक्स गोल्ड कॅ।इन"ची जाहिरात मागे.
उत्पादकाने आपल्या मालाच्या विक्रीसाठी किंवा त्याच्या जाहिरातीसाठी स्पर्धा, लॉटरी किंवा नशिबावर विसंबून असलेली कोणतीही योजना राबविणे ही ग्राहक संरक्षण कायद्याने अनुचित व्यापार प्रथा ठरविली असून त्याविरुद्धच्या तक्रारींची सुनावणी करून ग्राहकांच्या हितरक्षणासाठी आवस्यक ते आदेश देण्याचे अधिकार ग्राहक न्यायालयांना दिले गेले आहेत. याचा आधार घेऊन मुंबई ग्राहक पंचायतने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे याचिका दाखल केली व या जाहिरातीस बंदी करण्याखेरीज ग्राहकांची फसवणूक केल्याबद्दल कंपनीस राष्ट्रीय ग्राहक कल्याण निधीत अडीच कोटी रुपये देण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली. या याचिकेवर आयोगापुढे ४ व ५ जानेवारी रोजी सुनावणी झाली व कोणताही अंतरिम आदेश न देता प्रकरण ६ एप्रिलपर्यंत तहकूब केले गेले.
हिंदूस्तान लिव्हर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबई ग्राहक पंचायतच्या कार्यालयास भेट देऊन पंचायतीचे अध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे, चिटणीस ज्योती मोडक व ‘अॅड वॉच क्लब’च्या प्रमुख अनुराधा देशपांडे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी दोन्ही बाजूंनी आपापले दृष्टिकोन मांडले. त्यानंतर आता कंपनीचे कार्यकारी संचालक (विधी) अशोक गुप्ता यांनी शिरीष देशपांडे यांना १४ जानेवारी रोजी पत्र पाठवून यापुढे कंपनी ‘लक्स गोल्ड कॉईन ऑफर’ची जाहिरात करणार नाही, असे कळविले आहे.
संदर्भ: लोकसत्ता दि. १६/०१/१०

Tuesday, January 12, 2010
अंधेरी-जोगेश्वरी विभाग रौप्यमहोत्सवी मेळावा. (१० जाने. २०१०)
अंधेरी-जोगेश्वरी विभागाचा रौप्यमहोत्सवी मेळावा दि.१० जाने.२०१० रोजी कामगार कल्याण केंद्र,महानगरपालिका,के(पूर्व)गुंदवली,अंधेरी(पूर्व),मुंबई ४०० ०६९ येथे स.११वा.सुरू झाला.
डॅ।.रामदास गुजराथी अध्यक्ष, मु.ग्रा.पं.यांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे श्री.अशोक पानवलकर संपादक,महाराष्ट्र टाइम्स हे होते.
व्यासपीठावर विभागाचे अध्यक्ष श्री.अरविंद देशपांडे, मु.ग्रा.पं.चे कार्याध्यक्ष श्री.शिरीष देशपांडे व विभागाच्या कार्याध्यक्षा श्रीम.ज्योती मॊडक उपस्थित होत्या.
श्री.शिरीष देशपांडे यांनी मुं.ग्रा.पं.ने २५००० सदस्यांचा टप्पा ओलांडला हे अभिमानाने नमूद केले.वीज आणि पाणीसंकटाविषयी चिंता व्यक्त करून "चला,वांचवू वीज,वांचवू पाणी" या मोहीमेत सहभागी होण्याचे सर्वांना आवाहन केले.
"प्रसारमाध्यमांचे ग्राहक चळवळीत योगदान" यावर श्री.पानवलकर यांनी आपले विचार मांडले.बातम्या देण्यापुरते योगदान बह्वंशी मर्यादित आहे.जाहिरातींपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर वृत्तपत्रे/प्रसारमाध्यमे अवलंबून असल्यामुळे काहीवेळा चळवळीला हानीकारक भूमिका घेतली जाते असे ते म्हणाले.
श्री.अरविंद देशपांडे यांनी वीज, टेलिफोन,शिक्षण, आरोग्य यावर होणाऱ्या वाढत्या खर्चाकडे लक्ष वेधले. "There is enough for everybody's needs but not for everybody's greed" हे महात्मा गांधींचे वाक्य त्यांनी उदधृत केले.
डॅ।.रामदास गुजराथी यांनी प्रसारमाध्यमांनी बातम्यांचे रूपांतर प्रश्नांत करावे व ते प्रश्न धसास लावण्यासाठी चळवळीला मदत करावी,असे सांगितले.मु.ग्रा.पं.ने ग्राहकसेवाकेंद्रे सुरू करावी व त्याबरॊबर ग्राहकांना जागृत करावे अशी सूचना केली.
"प्रसार माध्यमे ग्राहकांना गृहीत धरत आहेत का?" या परिसंवादांत श्री.प्रशांत दीक्षित,श्री.राजीव तांबे,श्री.मिलिन्द कोकजे,श्री.दिनेश अडावदकर व श्रीम.अनुराधा देशपांडे यांनी भाग घेतला.
दुपारच्य़ा सत्रांत श्रीम.दीपाली केळकर यांचा "शब्दांच्या गांवा जावे" व श्री.शरद पोंक्षे यांचा "नथुराम ते देवराम-लाखमोलाच्या गप्पा" हे उद्बोधक आणि मनोरंजक कार्यक्रम झाले.
Sunday, January 10, 2010
बोरीवली विभाग मेळावा- ९ जानेवारी २०१०
शनिवार दि. ९ जानेवारी २०१० या दिवशी मनोहर हरिराम चोगले विद्यालय, गोराई,बोरीवली(प) येथे मुं.ग्रा.पं,चे उपाध्यक्ष श्री.विवेक पत्की यांच्या अध्यक्षतेखाली बोरीवली विभागाचा २३वा वार्षिक मेळावा झाला. या कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष श्री. बिंदुमाधव जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
"साधक मित्रांनो" असे कार्यकर्त्यांना संबोधून श्री.बिंदुमाधव जोशी यांनी "ग्राहक चळवळीची पालखी आपल्याला पुढे न्यावयाची आहे" याचे स्मरण करुन दिले. "आपली ग्राहक चळवळ ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या शुद्धीकरणाचा प्रकल्प आहे.रचनात्मक मार्गाने सविनय कायदेपालनाद्वारे आपल्याला काम करावयाचे आहे.ग्राहकाला जागे करावयाचे आहे.प्रशासनाशी संपर्क साधला पाहिजे. लेखणीयुद्ध केले पाहिजे." असे सांगून "हा ग्राहक चळवळीचा वसा टाकू नका" असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
कार्याध्यक्ष श्री.शिरीष देशपांडे यांनी वितरणाबरोबरच मुं.ग्रा.पं.ग्राहक चळवळीची अन्य कामेही कशी करते हे सोदाहरण स्पष्ट केले. रिलायन्सची मक्तेदारी मोडून ग्राहकांना टाटांची स्वस्त वीज कशी मिळवून दिली तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ग्रा.सं.कायद्याच्या कक्षा संकुचित झाल्यामुळे त्यावर कायद्यांत स्पष्टीकरणात्मक सुधारणा करण्यासठी मा.श्री.शरद पवार यांच्याकडून अभिवचन कसे मिळविले याची माहिती त्यांनी दिली.
समारंभाचे अध्यक्ष श्री. विवेक पत्की यांनी एक माणूसही कशी चळवळ करूं शकतो हे राल्फ नाडर यांच्या उदाहरणावरून शिकण्यासारखे आहे असे सांगितले."Instead of cursing the darkness, light a candle" हे माजी उपाध्यक्ष कै.एम.आर.पै यांचे उद्गार उद्धृत करून प्रत्येक नागरिकाने सैनिक झाले पाहिजे असे आग्रहाचे प्रतिपादन त्यांनी केले. "ग्राहकहिताय" इ-मेलद्वारे पाठविला तर कागदाची/वनराईची बचत होईल, पर्यावरणाचॆ रक्षण होईल हे त्यांनी ध्यानांत आणून दिले.तरुण पिढी प्रामाणिक आहे, रोखठोक आहे त्यांच्या साह्याने पद्धतशीर प्रयत्न केल्याशिवाय चळवळ पुढे जाणार नाही असे त्यांनी बजावले.
सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून आयोजित केलेल्या अस्मिता केंद्राच्या शारीरिक अपंग पण सक्षम व्यक्तींनी सादर केलेल्या उत्कृष्ट कार्यक्रमानंतर पसायदान झाले व पूर्णोपहाराने सांगता झाली
Thursday, January 7, 2010
संगणकावर मराठीचा वापर.
मराठी भाषेत देवनागरी लिपीत टंकलेखन करणे आता अगदी सोपे आहे.
८१ वर्षाच्या आजींनी केवळ १५ मिनिटांत सर्व समजून घेऊन मराठीत टंकलेखन केले. तुम्हालाही निश्चित जमेल.
पुढील संकेतस्थळाला भेट द्या. http://maayboli.com/jslib/html/dvedt.html
उच्चारानुसार टंकलेखन करून लिहिता येते.
आपला अनुभव कळवा.

Monday, January 4, 2010
वितरण केंद्र प्रतिनिधी सभा. (३/१/२०१०)
मुंबई ग्राहक पंचायतीच्या वितरण केंद्रांचे प्रतिनिधी , मु.ग्रा.पं.चे पदाधिकारी आणि काही सदस्य यांची संयुक्त सभा रविवार दि.३ जानेवारी २०१० रोजी स.११.३० ते दु.४.१५ या वेळांत दादर कार्यालयांत झाली. या सभेत मुंबई,ठाणे,पालघर,रायगड आणि वसई केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी स्थायी समिती अध्यक्ष प्रा.कमलाकर पेंडसे यांनी आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेऊन गेल्या ३५ वर्षांतील वितरणांतील यशाची काही सूत्रे सांगितली. चर्चेच्या ओघात आलेल्या सूचना लक्षांत घेऊन ही सर्वसाधारण सूत्रे पुढीलप्रमाणे:
१) मागणी तितकीच खरेदी. (माल शिल्लक नाही; दुकान नको.)
२) पैसे आल्याशिवाय वितरण नाही. (वसुलीचा प्रश्न नाही. देणेकरी/घेणेकरी नाहीत.)
३) Payment to suppliers: a) against delivery. b) within 7 days. (पुरवठादरांमध्ये उत्तम Goodwill. कदाचित आपली bargaining power अधिक.)
४) ना नफा; ना तोटा. (वित्तसंचय नाही. Excess of income over expenditure मर्यादित)
५) व्यवहार फक्त चेकने. (Payment record; No cash handling, पारदर्शकता)
६) माल संघपोच; सदस्यपोच नाही. (संघ ही entity शाबूत. तो संघटनेचा पाया. स्वयंसेवक वृत्तीला वाव.)
७) सदस्याच्या प्रत्येक तक्रारीला/सूचनेला प्रतिसाद. (विश्वासार्हता वाढते, सभासदांमध्ये समाधान, loyalty राहते-वाढते.)
८) दर आठवड्याला खरेदी प्रक्रिया-वितरण. (खाद्यवस्तू विशेषत: पीठे ताजी; मालचा संचय नाही, जागेचा पुरेपूर उपयोग.)
९) कायद्याच्या आधीन राहून सर्व व्यवहार. licences, taxes etc. (पारदर्शकता, नैतिक मूल्यांचे पालन)
१०) महिना संपल्यावर १० दिवसांत सर्व हिशेब तयार. (व्यवहाराचे चित्र ताबडतोब मिळते, आवश्यक ते बदल शक्य.)
वितरणाची वैशिष्ट्यपूर्ण रचना:
१) खरेदी समिती-Voluntary Workers-supported by Managing Committee.
2) वितरण व्यवस्था Paid Workers-guided by Voluntary Workers-supported by Managing Committee.
३) संघ व त्याची वितरण व्यवस्था-Voluntary Workers.
ह्या कार्यातून वितरण केंद्र एक चळवळीचे केंद्र बनेल; असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Subscribe to:
Posts (Atom)