Saturday, October 30, 2010

तक्रार निवारण मार्गदर्शन कक्षाची तिमाही बैठक. ३०/१०/२०१०

मुंबई ग्राहक पंचायतीच्या तक्रार निवारण मार्गदर्शन कक्षाची तिमाही बैठक दादर कार्यालयांत दि.३०/१०/२०१० या दिवशी दु.३वा. कार्योपाध्य्क्ष श्री.भालचंद्र नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली.

श्रीम.कोरडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले,दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व श्री.भालचंद्र नाईक व प्रमुख वक्ते श्री.अभय दातार यांची ओळख करून दिली.

श्री.अभय दातार यांनी आपल्या दीड तासाच्या अभ्यासपूर्ण भाषणांत "बॅंकिंग"संबंधी ग्राहकांना उपयुक्त अशी माहिती दिली. ग्राहकांच्या सोयीसाठी या व अन्य उपयुक्त विषयावर फोल्डर्स प्रसिद्ध करावीत अशी सूवना श्री.कमळाकर पेंडसे यांनी केली.

प्रश्नोत्तरानंतर श्रीम.कोरडे यांनी संबंधितांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रम संपला.

Monday, February 22, 2010

गिरगांव विभाग-२०वा वार्षिक मेळावा (२१/०२/२०१०)


मुंबई ग्राहक पंचायतीच्या गिरगांव विभागाचा २० वा वार्षिक मेळावा रविवार दि.२१/०२/२०१० रोजी संध्याकाळी ४.३०वा स्वस्तिक लीगच्या सभागृहांत सुरू झाला.
व्यासपीठावर मध्यभागी विभागाच्या अध्यक्षा श्रीमती वसुंधरा पेंडसे-नाईक,त्यांच्या डावीकडे विभागाचे कार्याध्यक्ष श्री.अभय दातार व मुं.ग्रा.पं.चे कार्योपाध्यक्ष श्री.भालचंद्र नाईक व अध्यक्षांच्या उजवीकडे प्रमुख पाहुण्या श्रीमती अनुराधा देशपांडे व विभागाच्या कार्यवाह श्रीमती शकुंतला म्हात्रे चित्रांत दिसत आहेत.
(छायाचित्र : विभागाच्या सहकार्यवाह श्रीमती सविता चवाथे यांच्या सौजन्याने)

Monday, February 15, 2010

विलेपार्ले विभाग रौप्य महोत्सवी ग्राहक मेळावा १४/२/२०१०



मुंबई ग्राहक पंचायतीच्या विलेपार्ले विभागाचा रौप्य महोत्सवी वार्षिक समारंभ रविवार दि.१४/२/२०१० या दिवशी दु.४ ते ७ या वेळांत विलेपार्ले महिला संघाच्या सभागृहांत साजरा झाला.प्रमुख पाहुणे म्हणून डॅ।.गिरीश जाखोटिया उपस्थित होते.या प्रसंगी कै.भाऊमामा गोगटे पारितोषकांचे वितरण, समारंभाचे अध्यक्ष श्री.भालचंद्र नाईक यांच्या हस्ते करण्यांत आले.विभागाच्या कार्याध्यक्षा श्रीमती आशालता वाघमोडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.डॅ। जाखोटिया यांनी कृष्णचरित्रांतील प्रसंगांचा संदर्भ देत आजच्या काळांत कृष्णाचा आदर्श ठेवून आपण सर्वांनी त्याप्रमाणे वागले पाहिजे असे अत्यंत परिणामक पद्धतीने प्रतिपादन केले.

Monday, February 8, 2010

बोरीवली विभाग मेळावा- ९ जानेवारी २०१०



उपाध्यक्ष श्री.विवेक पत्की, कार्योपाध्यक्ष श्री.भालचंद्र नाईक, ज्येष्ट सदस्य श्री.अरविंद दिघे,ग्राहक चळवळीचे प्रणेते श्री. बिंदुमाधव जोशी आणि कार्याध्यक्ष श्री.शिरीष देशपांडे.

Thursday, January 21, 2010

CENTRAL ADVISORY COMMITTEE of CERC, Delhi.

It gives me pleasure to congratulate Ad.Shirish Deshpande,Chairman Mumbai Grahak Panchayat on his appointment as a member of Central Advisory Committee of CERC (Central Electricity Regulatory Commission)

This committee gives advice on major questions of policy,quality,continuity and expert services provided by licensees,protection of consumer interests and overall standards of performance by utilities.

Wednesday, January 20, 2010

गुंतवणुकदारांच्या माहितीसाठी.

सस्नेह नमस्कार,

कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय, भारत सरकार, यांनी गुंतवणुकदारांचे सक्षमीकरण, प्रशिक्षण, अधिकार मिळवून देणे, त्यांचे संरक्षण करणे, आदी गोष्टींसाठी
पुढाकार घेतला असून खालील वेबसाईट्स / ऑनलाईन सेवा चालू केल्या आहेत.

1) कंपन्यांबाबत सर्वंकष माहितीसाठी : www.mca.gov.in
2) ऑनलाईन गुंतवणुकदार तक्रार निवारणासाठी : www.investorhelpline.in
3) गुंतवणुकदार जागृतीशी संबंधित माहिती : www.iepf.in
4) कर्तव्यच्युती वा नियमांचे उल्लंघन करणा-या कंपन्या वा संचालकांबाबत महितीसाठी : www.watchoutinvestor.com

आपण आवश्यकता पडल्यास वरील सेवेचा लाभ अवश्य घ्या.

(संदर्भ : दै. लोकसत्ता, 8 डिसेंबर, 2009.)
धन्यवाद,
अभय दातार,
कार्याध्यक्ष, गिरगाव विभाग

Sunday, January 17, 2010

दहिसर विभागाचा मेळावा (१७/०१/१०)


रविवार दि.१७/०१/१० रोजी मुं.ग्रा.पं.च्या दहिसर विभागचा मेळावा विभागाचे अध्यक्ष श्री.जयकुमार शहा यांच्या अध्यक्षतेखाली समाज कल्याण मंदिर, दहिसर (प) येथे सं. ५.०० ते ८.३० या वेळांत झाला. संस्थापक सदस्य श्री. अशोक रावत, संस्थेचे अध्यक्ष डॅ।.रामदास गुजराथी, कार्यवाह श्रीम. ज्योती मोडक, निसर्गोपचार तज्ज्ञ श्री. अरुण जोगदेव आदि मान्यवर उपस्थित होते.

दीपप्रज्वलनानंतर चि.निनाद व सायली शेंबेकर यांच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. श्री.कांबळी यांनी अहवाल वाचन केले तर श्री.होडावडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

“शाश्वत जीवनशैली” या विषयावर बोलतांना श्री.अशोक रावत यांनी गरजेपुरता उपभोग हे सूत्र संवेदनशील ग्राहकाने ध्यानांत ठेवले पाहिजे, असे आग्रहाचे प्रतिपादन केले. उत्पादनांत वाढ,वितरणांत समानता आणि उपभोगावर संयम या त्रिसूत्रीबरोबरच पर्यावरणाचे संतुलन या चवथ्या सूत्राचा अवलंब आपण केला पाहिजे. त्यासाठी मर्यादित नैसर्गिक स्रोतांचा आणि पर्यावरणाचा कमीत कमी ऱ्हास होऊन मर्यादित साठे पुढील पिढीसाठी राखून ठेवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. Refuse, Reduce, Repair, Reuse, Recycle करून कचऱ्याची विल्हेवाट लावतांना त्यापासून संपत्ती कशी निर्माण करता येईल, हे पाहण्यास सांगितले.

श्री. अरुण जोगदेव यांनी माणसाला औषधांची गरज नाही हे ठासून सांगितले. चहा, कॅ।फी, साखर, डालडा, त्यात बनविलेली बिस्किटे आदि पदार्थ याद्वारे एकप्रकारे आपण विषप्राशन कसे करतो, हे त्यांनी निदर्शनास आणले. भाज्यांचे सूप, कच्चे अन्नपदार्थ, भात, पोळी खाऊन कसे निरोगी जगता येते, हे अनेक उदाहरणाद्वारे त्यांनी समजाऊन सांगितले.

डॅ।.रामदास गुजराथी व श्री. जयकुमार शहा यांनी पुरेश्या वेळेच्या अभावी थोडक्यांत, समयोचित बोलून ग्राहकांना मार्गदर्शन केले.

अंधेरी विभागांतील कार्यकर्त्यांनी श्रीम नीला म्हात्रे लिखित,दिग्दर्शित ग्राहकविषयक पथनाट्य प्रभावीपणे सादर केले.

जेवणसदृश अल्पोपहार व आभारानंतर कार्यक्रम संपला.

मुं.ग्रा.पं.च्या कार्यक्रमांचे फोटो श्री.राजेन्द्र राणे,बोरीवली यांच्या सौजन्याने उपलब्ध होतात. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.