Saturday, January 16, 2010

"लक्स गोल्ड कॅ।इन"ची जाहिरात मागे.

उत्पादकाने आपल्या मालाच्या विक्रीसाठी किंवा त्याच्या जाहिरातीसाठी स्पर्धा, लॉटरी किंवा नशिबावर विसंबून असलेली कोणतीही योजना राबविणे ही ग्राहक संरक्षण कायद्याने अनुचित व्यापार प्रथा ठरविली असून त्याविरुद्धच्या तक्रारींची सुनावणी करून ग्राहकांच्या हितरक्षणासाठी आवस्यक ते आदेश देण्याचे अधिकार ग्राहक न्यायालयांना दिले गेले आहेत. याचा आधार घेऊन मुंबई ग्राहक पंचायतने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे याचिका दाखल केली व या जाहिरातीस बंदी करण्याखेरीज ग्राहकांची फसवणूक केल्याबद्दल कंपनीस राष्ट्रीय ग्राहक कल्याण निधीत अडीच कोटी रुपये देण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली. या याचिकेवर आयोगापुढे ४ व ५ जानेवारी रोजी सुनावणी झाली व कोणताही अंतरिम आदेश न देता प्रकरण ६ एप्रिलपर्यंत तहकूब केले गेले.

हिंदूस्तान लिव्हर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबई ग्राहक पंचायतच्या कार्यालयास भेट देऊन पंचायतीचे अध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे, चिटणीस ज्योती मोडक व ‘अ‍ॅड वॉच क्लब’च्या प्रमुख अनुराधा देशपांडे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी दोन्ही बाजूंनी आपापले दृष्टिकोन मांडले. त्यानंतर आता कंपनीचे कार्यकारी संचालक (विधी) अशोक गुप्ता यांनी शिरीष देशपांडे यांना १४ जानेवारी रोजी पत्र पाठवून यापुढे कंपनी ‘लक्स गोल्ड कॉईन ऑफर’ची जाहिरात करणार नाही, असे कळविले आहे.

संदर्भ: लोकसत्ता दि. १६/०१/१०

No comments:

Post a Comment