Sunday, January 10, 2010

बोरीवली विभाग मेळावा- ९ जानेवारी २०१०


शनिवार दि. ९ जानेवारी २०१० या दिवशी मनोहर हरिराम चोगले विद्यालय, गोराई,बोरीवली(प) येथे मुं.ग्रा.पं,चे उपाध्यक्ष श्री.विवेक पत्की यांच्या अध्यक्षतेखाली बोरीवली विभागाचा २३वा वार्षिक मेळावा झाला. या कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष श्री. बिंदुमाधव जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

"साधक मित्रांनो" असे कार्यकर्त्यांना संबोधून श्री.बिंदुमाधव जोशी यांनी "ग्राहक चळवळीची पालखी आपल्याला पुढे न्यावयाची आहे" याचे स्मरण करुन दिले. "आपली ग्राहक चळवळ ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या शुद्धीकरणाचा प्रकल्प आहे.रचनात्मक मार्गाने सविनय कायदेपालनाद्वारे आपल्याला काम करावयाचे आहे.ग्राहकाला जागे करावयाचे आहे.प्रशासनाशी संपर्क साधला पाहिजे. लेखणीयुद्ध केले पाहिजे." असे सांगून "हा ग्राहक चळवळीचा वसा टाकू नका" असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

कार्याध्यक्ष श्री.शिरीष देशपांडे यांनी वितरणाबरोबरच मुं.ग्रा.पं.ग्राहक चळवळीची अन्य कामेही कशी करते हे सोदाहरण स्पष्ट केले. रिलायन्सची मक्तेदारी मोडून ग्राहकांना टाटांची स्वस्त वीज कशी मिळवून दिली तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ग्रा.सं.कायद्याच्या कक्षा संकुचित झाल्यामुळे त्यावर कायद्यांत स्पष्टीकरणात्मक सुधारणा करण्यासठी मा.श्री.शरद पवार यांच्याकडून अभिवचन कसे मिळविले याची माहिती त्यांनी दिली.

समारंभाचे अध्यक्ष श्री. विवेक पत्की यांनी एक माणूसही कशी चळवळ करूं शकतो हे राल्फ नाडर यांच्या उदाहरणावरून शिकण्यासारखे आहे असे सांगितले."Instead of cursing the darkness, light a candle" हे माजी उपाध्यक्ष कै.एम.आर.पै यांचे उद्गार उद्धृत करून प्रत्येक नागरिकाने सैनिक झाले पाहिजे असे आग्रहाचे प्रतिपादन त्यांनी केले. "ग्राहकहिताय" इ-मेलद्वारे पाठविला तर कागदाची/वनराईची बचत होईल, पर्यावरणाचॆ रक्षण होईल हे त्यांनी ध्यानांत आणून दिले.तरुण पिढी प्रामाणिक आहे, रोखठोक आहे त्यांच्या साह्याने पद्धतशीर प्रयत्न केल्याशिवाय चळवळ पुढे जाणार नाही असे त्यांनी बजावले.

सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून आयोजित केलेल्या अस्मिता केंद्राच्या शारीरिक अपंग पण सक्षम व्यक्तींनी सादर केलेल्या उत्कृष्ट कार्यक्रमानंतर पसायदान झाले व पूर्णोपहाराने सांगता झाली

2 comments:

  1. Dear Sir

    Pls change location Bhabai to Gorai


    Yours
    Rajendra Rane

    ReplyDelete
  2. प्रियमित्र श्री.राजेन्द्र राणे,
    नमस्कार.

    सूचनेबद्दल आभार.त्यानुसार बदल केला आहे.

    धन्यवाद.
    आपला स्नेहांकित
    भालचंद्र नाईक.

    ReplyDelete