
अंधेरी-जोगेश्वरी विभागाचा रौप्यमहोत्सवी मेळावा दि.१० जाने.२०१० रोजी कामगार कल्याण केंद्र,महानगरपालिका,के(पूर्व)गुंदवली,अंधेरी(पूर्व),मुंबई ४०० ०६९ येथे स.११वा.सुरू झाला.
डॅ।.रामदास गुजराथी अध्यक्ष, मु.ग्रा.पं.यांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे श्री.अशोक पानवलकर संपादक,महाराष्ट्र टाइम्स हे होते.
व्यासपीठावर विभागाचे अध्यक्ष श्री.अरविंद देशपांडे, मु.ग्रा.पं.चे कार्याध्यक्ष श्री.शिरीष देशपांडे व विभागाच्या कार्याध्यक्षा श्रीम.ज्योती मॊडक उपस्थित होत्या.
श्री.शिरीष देशपांडे यांनी मुं.ग्रा.पं.ने २५००० सदस्यांचा टप्पा ओलांडला हे अभिमानाने नमूद केले.वीज आणि पाणीसंकटाविषयी चिंता व्यक्त करून "चला,वांचवू वीज,वांचवू पाणी" या मोहीमेत सहभागी होण्याचे सर्वांना आवाहन केले.
"प्रसारमाध्यमांचे ग्राहक चळवळीत योगदान" यावर श्री.पानवलकर यांनी आपले विचार मांडले.बातम्या देण्यापुरते योगदान बह्वंशी मर्यादित आहे.जाहिरातींपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर वृत्तपत्रे/प्रसारमाध्यमे अवलंबून असल्यामुळे काहीवेळा चळवळीला हानीकारक भूमिका घेतली जाते असे ते म्हणाले.
श्री.अरविंद देशपांडे यांनी वीज, टेलिफोन,शिक्षण, आरोग्य यावर होणाऱ्या वाढत्या खर्चाकडे लक्ष वेधले. "There is enough for everybody's needs but not for everybody's greed" हे महात्मा गांधींचे वाक्य त्यांनी उदधृत केले.
डॅ।.रामदास गुजराथी यांनी प्रसारमाध्यमांनी बातम्यांचे रूपांतर प्रश्नांत करावे व ते प्रश्न धसास लावण्यासाठी चळवळीला मदत करावी,असे सांगितले.मु.ग्रा.पं.ने ग्राहकसेवाकेंद्रे सुरू करावी व त्याबरॊबर ग्राहकांना जागृत करावे अशी सूचना केली.
"प्रसार माध्यमे ग्राहकांना गृहीत धरत आहेत का?" या परिसंवादांत श्री.प्रशांत दीक्षित,श्री.राजीव तांबे,श्री.मिलिन्द कोकजे,श्री.दिनेश अडावदकर व श्रीम.अनुराधा देशपांडे यांनी भाग घेतला.
दुपारच्य़ा सत्रांत श्रीम.दीपाली केळकर यांचा "शब्दांच्या गांवा जावे" व श्री.शरद पोंक्षे यांचा "नथुराम ते देवराम-लाखमोलाच्या गप्पा" हे उद्बोधक आणि मनोरंजक कार्यक्रम झाले.
No comments:
Post a Comment