Monday, February 22, 2010

गिरगांव विभाग-२०वा वार्षिक मेळावा (२१/०२/२०१०)


मुंबई ग्राहक पंचायतीच्या गिरगांव विभागाचा २० वा वार्षिक मेळावा रविवार दि.२१/०२/२०१० रोजी संध्याकाळी ४.३०वा स्वस्तिक लीगच्या सभागृहांत सुरू झाला.
व्यासपीठावर मध्यभागी विभागाच्या अध्यक्षा श्रीमती वसुंधरा पेंडसे-नाईक,त्यांच्या डावीकडे विभागाचे कार्याध्यक्ष श्री.अभय दातार व मुं.ग्रा.पं.चे कार्योपाध्यक्ष श्री.भालचंद्र नाईक व अध्यक्षांच्या उजवीकडे प्रमुख पाहुण्या श्रीमती अनुराधा देशपांडे व विभागाच्या कार्यवाह श्रीमती शकुंतला म्हात्रे चित्रांत दिसत आहेत.
(छायाचित्र : विभागाच्या सहकार्यवाह श्रीमती सविता चवाथे यांच्या सौजन्याने)

4 comments:

  1. मुंबई ग्राहक पंचायत, गिरगाव विभाग,वार्षिक मेळावा, दिनांक २१ फेब्रुवारी २०१०.

    मेळव्याची सुरवात श्रीमती वसुंधरा पेंडसे नाईक यांनी दिप प्रज्वलन करुन केली. सौ.शुभांगी जोशी यांनी ईशस्तवन केले.श्री.अभय दातार, कार्याध्यक्ष,गिरगाव विभाग,यांनी प्रस्ताविक केले. प्रत्येकाने

    ग्राहकजाग्रुतीसाठी मदत केली पाहिजे असे त्यांनी आवाहन केले.कार्यवाह, श्रीमती शकुंतला म्हात्रे यांनी अहवाल वाचन केले.एड वॉच क्लबच्या अध्यक्ष,श्रीमती अनुराधा देशपांडे यांनी जाहीरात डोळसपणे कशी पहावी याचे मार्गदर्शन केले.मुं.ग्रा.पंचे कार्योपाध्यक्ष,श्री.भालचन्द्र नाईक यांनी पाणी व वीज यांचा संयमीत उपभोग घेउन त्याची बचत करावी असे आवाहन केले.श्रीमती वसुंधरा पेंडसेनाईक यांनी मुलांना मराठीतूनच बोलण्याची सवय असावी असे सांगुन संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल माहीती सांगितली.अंधेरी विभागाच्या महीला कार्यकर्त्यांनी छान पथनाट्य सादर केले. श्री.श्रीनिवास मोदगी यांच्या चारोळ्यांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम झाला.संपुर्ण कार्यक्रमाचे निवेदन कु.धारप यांनी केले.श्रीमती सविता चवाथे यांनी सर्वांचे आभार मानले. चहा व नाश्ता झाल्यावर 'जन -गण-मन' म्हणुन कार्यक्रमाची सांगता झाली

    ReplyDelete
  2. The "Patha Natya" performed by Andheri Vibhag was just one of its kind. It was neatly written containing present issues and perfectly posted specific message on consumer awareness. I feel that all the Vibhags should arrange such plays during their seminars (whenever arranged) because they are more effective than a lecture or a lengthy write-up. Congratuilations.

    ReplyDelete
  3. Please make a post on meterjam. Your panchayat declared support for it. Your blog is giving interesting information.

    ReplyDelete
  4. 休息是為了走更長遠的路,爬個文章休息一下!!..................................................................

    ReplyDelete