धोरण ठरविणे, निर्णय घेणे आणि त्याची अंमलबजावणी करणे यांत गुणात्मक बदल घडविण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता लक्षांत घेऊन मुख्यत्वे मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकारिणी सदस्यांसाठी आणि निर्णय प्रक्रियेशी संबंधित असणाऱ्या काही कार्यकर्त्यांसाठी एक प्रशिक्षण शिबिर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या साह्याने ज्ञान नैपुण्य केंद्र, उत्तन येथे शनिवार दि.५ व रविवार दि.६ डिसेंबर २००९ या दिवशी आयोजित करण्यांत आले होते.
या शिबिरांत मुं.ग्रा.पं.च्या विश्वस्त श्रीम.ललिताताई कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री.विवेक पत्की, ज्येष्ट सदस्य श्री.कमलाकर पेंडसे आदि मान्यवरही उपस्थित होते. कार्यकारिणी सदस्य आणि निमंत्रित मिळून एकूण २३ जणांनी या शिबिरांत भाग घेतला.
कार्याध्यक्ष श्री. शिरीष देशपांडे यांनी दीप प्रज्वलन करून या शिबिराचे उदघाटन केले.
“ ग्राहक चळवळीचा मापदंड ठरणारे कार्य मुं.ग्रा.पं. चे आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा हा बहुमान आहे की प्रशिक्षण वर्गाचे भाग्य आम्हाला लाभले ” असे गौरवोद्गार या प्रसंगी प्रबोधिनीचे संचालक डॅ।.विनय सहस्रबुद्धे यांनी काढले.
शिबिराचे उद्दिष्ट सांगतांना कार्याध्यक्ष श्री. शिरीष देशपांडे यांनी ग्राहक चळवळीत प्रभावीपणे, सक्षमतेने कार्य करण्यासाठी या प्रशिक्षण शिबिराचा उपयोग होईल अशी आशा व्यक्त केली.
पहिल्या दिवशीच्या ४ सत्रांत स्वयंसेवी संस्थांचे जग (डॅ।.विनय सहस्रबुद्धे), स्वयंसेवी संस्थांचे व्हिजन आणि मिशन, स्वयंसेवी संस्थांची व्यवसायनिष्ठता, कायदेशीर औपचारिकता आणि कार्यपद्धती (श्री.विवेक अत्रे), संस्थात्मक संबंध: जनसंपर्क, प्रतिनिधित्व आणि अन्य पैलू (श्री. प्रशांत दीक्षित) हे विषय होते.
दुसऱ्या दिवशीच्या सत्रांत संस्थात्मक नेतृत्व, सहभागिता, आणि टीम कार्यपद्धती, नेतृत्वाच्या दुसऱ्या फळीची जोपासना (श्री.गिरीश जाखोटिया), स्वयंसेवी संस्थांसाठी वित्तीय अनुशासन (श्री.चंद्रशेखर वझे) हे विषय होते.
शेवटच्या सत्राची सुरुवात श्री.कमलाकर पेंडसे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर मुंबई ग्राहक पंचायतीपुढील आव्हानांसंबंधी सदस्यांनी आपले विचार मांडले. या सत्राचे अध्यक्षस्थान मुं.ग्रा.पं.चे अध्यक्ष डॅ।.रामदास गुजराथी यांनी भूषविले होते. समारोप करतांना आपले मार्गदर्शक विचार त्यांनी मांडले आणि “दर २ महिन्यांनी नियमितपणे अशी शिबिरे घ्यावीत”, असे प्रतिपादन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment